Parbhani - जिंतूर : शासकीय नौकर भरतीसाठी नियुक्त केलेल्या खाजगी एजन्सीचा निर्णय रद्द करण्याची मागणी -
राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगाराच्या भविष्यावर परिणाम करणारे निर्णय घेतले असुन ते तात्काळ रद्द करण्याची मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारमार्फत राज्यपाल यांना पाठविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने यापुढे महाराष्ट्रात नौकर भरती करताना ही नौकर भरती खाजगी एजन्सीमार्फत करण्याचा निर्णय घेतला असुन महाराष्ट्राच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्यावर दुरगामी परिणाम करणारा आहे. म्हणुन या 9 एजन्सी शासनाने रद्द कराव्यात, संबंधित शासन निर्णय रद्द करावा आणि नौकर भरती प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनानेच करावी.
महाराष्ट्रातील नौकर भरतीसाठी 138 पद संवगार्तील वर्ग 3 आणि 4 मधील बहुतांश पदे येत आहेत. ते सर्व कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत. म्हणुन महाराष्ट्रातील सर्व जाती-धमातील सुशिक्षीत बेरोजगार अधिकच संकटात सापडेल, म्हणुन हा शासन निर्णय रद्द करावा.
वंचित बहुजन आघाडी जिंतूर तालुक्याच्या वतीने वरील मागण्या आम्ही राज्यपाल महोदय, महाराष्ट्र यांच्याकडे करीत असुन येणाऱ्या महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2) ऑक्टो) हा शासन निर्णय रद्द करावा अन्यथा वचित बहुजन आघाडी जिंतूर तालुकाच्या वतीने मा. तहसीलदार कार्यालय जिंतूर यांच्या कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात येतील असा ईशारा तालुका प्रशासनास दिला .
कंत्राटी भरती करताना यामध्ये आरक्षण असणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या आरक्षण संपविण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत असून, गरीब व बेरोजगार यांची थट्टा / चेष्ट्रा हे सरकार करीत आहे. म्हणुन हा निर्णय रद्द करावा.
महाराष्ट्रातील 60,000 हजार शाळा खाजगी पैसेवाल्या लोकांना / संस्थाना देण्याचा शासन निर्णय भवितव्यासाठी घातक असुन हा निर्णय देखील रद्द करावा असे मत आहे .
निवेदनावर साक्षर सतीश वाकळे मा .युवा जिल्हा उपाध्यक्ष भगवान दराडे जिल्हा महासचिव धम्मदीप साळवे जिल्हा सचिव ऑड सीमादेवी भुतकर महिला तालुकाध्यक्ष शिवाजी वाकळे ज्येष्ठ नेते वंचित भास्कर सूर्यवंशी ज्येष्ठ नेते वंचित इस्माईल हस्मी युवा नेते वंचित राजेंद्रकुमार भुतकर वंचित नेते विनोद कनकुटे ता कोषाध्यक्ष देवराव भिसे ता सल्लागार संदीप गायकवाड गुलाब गायकवाड सुनील गायकवाड विजयकुमार बडे कुलदीप घनसावंत सचिन वाघमारे संदीप रगडे विजय राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.