परभणी जिल्हाचा - जिंतूर तालुक्या मधे दिनांक २१ सप्टे. रोजी , बसस्टॉप परिसरा मधे जखमी अवस्थेत मृतदेह आढळला आहे, बातमीने तालुक्यात खळबळ .
सविस्तर माहिती अशी की दिनांक २१ सप्टेंबर - गुरुवार - सकाळी १० वा. सुमारास, जिंतूर येथील बसस्थानक परिसर समोर काटेरी झुडपांमध्ये मार असलेला अवस्थेत ३५ वर्षीय इसमाचा गंभीर अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच परिसरमधे बातमी पसरली व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनेस्थळी दाखल झाले व प्राथमिक तपास केलेला आहे .
खून झालेल्या ३५ वर्षीय इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही तरी गळा आवळून व दगड घालून मारलेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे .
स्वान पथक ( डॉग स्क्वाड ) द्वारे परिसराची पूर्ण पाहणी केली , या दरम्यान परिसरातील cctv फुटेज मधे काही हाती येतय का हे देखील लवकरच कळेल पुढील तपास चालू आहे .
- मिळालेल्या माहिती नुसार मृतास आधी लुटले आहे
- जेव्हा त्याने विरोध/प्रतिकार केला तेव्हा त्यास ठार केले .
- सूत्रा नुसार मृत व्यक्ती हा सातारा कडील आहे
edit - ( १२ तासात स्थानिक गुन्हे अन्वेष शाखा परभणी , व शहर पोलिस जिंतूर बस स्थानक मधील खुण प्रकरण आणले उघडकीस )
- ०३ आरोपी गजाआड .
प्रथम खुनाशी घटना : २,३ सप्टेंबर दरम्यान
- अश्याच प्रकारे मृतदेह जखमी अवस्थेत आढळला
- ठिकाण - बसस्टॉप समोरील परिसर